Video : ही राखी बांधू पण शकता, चॉकलेट आवडलं तर खाऊही शकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Video : ही राखी बांधू पण शकता, चॉकलेट आवडलं तर खाऊही शकता

Published on : 11 August 2022, 3:36 pm

राखी पौर्णिमेचा सण अवघ्या एक दिवसावर आला असल्या कारणाने पुण्यातील बाजारपेठामध्ये अनेक प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. कार्टून, इलेक्ट्रिक, ब्रेसलेट अशा अनेक प्रकारच्या राख्या यंदा सर्वत्र उपलब्ध आहेत मात्र तुम्ही कधी चॉकलेट राखी पाहिली आहे का?पुण्यात चक्क चॉकलेट राखी उपलब्ध आहे. अशी राखी जी तुम्ही बांधूही शकता आणि खाऊ सुद्धा शकता.पुण्यातील एका प्रसिद्ध असलेल्या एका बेकरी मध्ये चक्क चॉकलेट राखी उपलब्ध आहे. अशी राखी जी तुम्ही बांधूही शकता आणि खाऊ सुद्धा शकता.चॉकलेट राखीला नागरिकांकडून चांगली पसंती मिळते आहे.