Mon, June 5, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर
Published on : 8 May 2022, 10:02 am
आषाढीवारी साठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले. 20 जूनला संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल तर 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे होणार प्रस्थान होईल.9 जुलैला दोन्ही पालख्या पंढरपूर येथे पोहचणार.राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानं आता सर्व भाविकांना, वारकऱ्यांना पायी आषाढी वारी करता येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्ष वारकऱ्यांना आषाढी पायी वारी करता आली नाही. पण यंदा पायी वारी करता येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.