Sharad Pawar on Sanjay Raut: सामनाच्या 'त्या' अग्रलेखावर शरद पवारांची प्रतिक्रिया, ठाकरे - राऊतांना मारला टोमणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sharad Pawar on Sanjay Raut: सामनाच्या 'त्या' अग्रलेखावर शरद पवारांची प्रतिक्रिया, ठाकरे - राऊतांना मारला टोमणा

Published on : 9 May 2023, 9:29 am

Sharad Pawar on Sanjay Raut: सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत 'वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.' असा आरोप केला होता. त्यावर आता स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामना अग्रलेखातून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी संजय राऊत यांना चांगलच फटकारलं आहे. 'आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. हा आमच्या घरातला प्रश्न आहे', असे म्हणत पवार यांनी राऊत यांना सुनावलं.