Shiv Sena ला दिवसेंदिवस खंडर पडत असून अनेक नेते राजीनामे देत आहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Shiv Sena ला दिवसेंदिवस खिंडार पडत असून अनेक नेते राजीनामे देत आहेत

Published on : 18 July 2022, 11:30 am

महाराष्ट्रातील सत्ता गमावलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आहे. एनआयने याबाबतचे ट्विट केले आहे.

शिवसेनेत पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची रांग लागली आहे. यापूर्वी ५५ पैकी ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. यानंतर ठाणे, नवी मुंबईसह अनेक पालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

रामदास कदम हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले होते. रामदास कदम यांचा मुलगा योगेश दापोलीतून आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.

राजीनामा देताना लिहिलेल्या पत्रात कदम म्हणतात, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलिही किंमत राहिली नाही, हे पाहायला मिळालं. राष्ट्रवादी व कॉंग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज शिवसेना या पदाचा राजीनामा देत आहे.

आता रामदास कदम सुद्धा शिंदे गटात सामिल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेला गळती लागल्याने उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे नेते कार्यकर्ते शिवसेनेला सोडून जात असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे आम्हीच खरी शिवसेना असल्याचं वारंवार म्हणत आहेत.

एकीकडे शिवसेनेला नेते कार्यकर्ते सोडून जात आहेत. तर तिकडे शिंदे सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून असणार आहे. या निकालाची प्रतिक्षा असल्याने शिंदे सरकारकडून मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला नसल्याचं देखील बोललं जात आहे.

तुम्हाला या सगळ्या राजकारणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करुन सांगायला विसरु नका.

Web Title: Shiv Sena Is Collapsing Day By Day And Many Leaders Are Resigning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..