esakal | पुण्यात मॉल, अभ्यासिकांना परवानगी; दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

पुण्यात मॉल, अभ्यासिकांना परवानगी; दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली;पाहा व्हिडिओ

Jun 11, 2021

पुणे : पुणे शहरात येत्या सोमवारपासून दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत तर, हॉटेल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरु करण्यात येतील. येत्या रविवारपर्यंत कोरोनाबाबत आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली असल्यास सोमवारपासून अंमलबजावणी केली जाईल. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू राहतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना उपाययोजना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांसाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा पॉझिटिव्हिटी रेट पाहून त्यानुसार निर्बंध शिथिल करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. येत्या शनिवार आणि रविवारी विकेंडसाठी सध्या जी नियमावली लागू आहे तीच राहील. अशी माहितीही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.