ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण ; पाहा व्हिडिओ

Published on : 7 September 2021, 2:38 pm

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन् तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु असून मंगळवारीही दिवसभर पाऊस सुरूच आहे सूर्यदर्शन झाले नसून शेतातील उभ्या पिकांचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत 71 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. धसपिंपळगाव येथील ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी तरुणाचे प्राण वाचवले असून, त्याची दुचाकी मात्र वाहून गेली आहे. अबुझर बासित सौदागर(वय 20 रा.मंगळवार पेठ ,बार्शी) यांस ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी दोरी टाकून वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. ( व्हिडीओ : प्रशांत काळे)

Web Title: Solapur News Villagers Saved The Life Of The Youth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rainbarshi