Video : 'स्टंटबाजी सोडा, महाराष्ट्रात कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : 'स्टंटबाजी सोडा, महाराष्ट्रात कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही'

Published on : 12 May 2022, 6:51 am

राज ठाकरेंना काल धमकीचं पत्र आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांना पत्रकारांनी विचारलं असता, अशी धमकीचं पत्र आमच्या शिवसेना भवनात शेकड्याने येत असतात. महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही आणि जर लागत असेल तर केंद्र सरकार त्यांचं संरक्षण द्यायला समर्थ आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलंय. याबरोबरच राज ठाकरे जेव्हा घरातून निघतात तेव्हा त्यांच्या बरोबर किती पोलीस असतात बघितलं का? सरकार कोणीही असो सर्वसामान्यातला सर्व सामान्य माणसाचं त्याच्या जीवाला जर धोका असेल तर त्याला कुठलाही धोका न होऊ द्यायची जबाबदारी सरकारची असते त्यामुळे सरकार सक्षम आहे त्याची काही काळजी करू नये असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय .

Web Title: Stop Stunting No Ones Hair Will Be Touched In Maharashtra Sanjay Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top