Subhash Bhoir Kalyan Loksabha : ठाकरेंचा भिडू श्रीकांत शिंदेंना भिडणार, शिंदे पिता पुत्राची डोकेदुखी वाढणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Subhash Bhoir Kalyan Loksabha : ठाकरेंचा भिडू श्रीकांत शिंदेंना भिडणार, शिंदे पिता पुत्राची डोकेदुखी वाढणार?

Published on : 3 June 2023, 11:16 am

Subhash Bhoir Kalyan Loksabha : शिंदे फडणवीसांचे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय तो म्हणजे जागा वाटप कसे होणार कारण भाजपकडून अत्यंत आक्रमक असा प्रचार करुन वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावा ठोकला जातोय. याला शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीचा मतदारसंघदेखील अपवाद नाही. श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या या मतदारसंघावर भाजपकडून सातत्याने दावा केला जात आहे. एकीकडून भाजपकडून दबाव असताना दुसरीकडे आता ठाकरेंच्या एका खास माणसाने या मतदारसंघात श्रीकांत शिंदेंविरोधात शड्डू ठोकलाय. ठाकरेंचा हा कार्यकर्ता कोण श्रीकांत शिंदेविरोधात त्याला निवडणूक का लढवायची आहे आणि खरंच त्याची ताकद किती हे सगळं जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये