अल्पवयीन मुलीच्या मांडीवर 'कोंबडा' ठेऊन पूजन;पाहा व्हिडिओ
वाई (सातारा) : सुरूर (Surur Village) येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून स्मशानभूमीच्या एका कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर 'कोंबडा' देऊन मांत्रिकानं पूजन केल्याचा हा प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच, मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी व नातेवाइक बेपत्ता झाल्याचे कळतंय. मात्र, या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. वाई तालुक्यातील (Wai Taluka) सुरूर गावाच्या स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. मांत्रिकाच्या आदेशानं मुलीला प्रथम वाईतील कृष्णा नदीत अंघोळ घालण्यात आली. तद्नंतर तिचं नदीकाठीचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर मुलीला सुरूर येथील स्मशानभूमीत पुजण्याचा घाट घालण्यात आला. पुणे हडपसर येथून आलेली ही मुलगी व तिचे नातेवाइक मांत्रिकासह फरार झाले असून याबाबतचा अधिक तपास वाई पोलिस करत आहेत.
Web Title: Superstition Wai Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..