पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या 'यु टर्न'वर सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केले भाष्य

Friday, 12 February 2021

लोकसभेत अर्थसंकल्पावर आपले मत मांडताना बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधून घेतले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शेतकरी कायद्यावरून 'यु-टर्न' घेतला असे वक्तव्य केले होते.

लोकसभेत अर्थसंकल्पावर आपले मत मांडताना बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधून घेतले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शेतकरी कायद्यावरून 'यु-टर्न' घेतला असे वक्तव्य केले होते. त्याचे प्रतिउत्तर देताना खासदार सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारने गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयावर कसे 'यु-टर्न' घेतलेत हे मांडत सरकारची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबतीतहि काही शंका उपस्थित करून लवकर त्यांचे निरसन करण्याचे सरकारला आवाहन केले आहे.