बापाचं स्वप्न पूर्ण करणारी सुशिला; सायकल स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक..!

Wednesday, 7 April 2021

मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द हे गाव. पायाभूत सुविधांनी व लोकसंख्येने कमी असलेले हे गाव जिल्ह्याच्या नकाशात शोधायलाही तुम्हाला नाकीनऊ येतील. परंतु, या लहान गावाचं नाव थेट गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते युरोपीय देशांपर्यंत गाजवणारी मुलगी आहे सुशिलाची दुर्गाप्रसाद आगाशे... सुशिलाने आजतागायत पाच वेळ राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. राज्य पातळीवर सर्वच स्पर्धांमध्ये तिने स्वर्णपदक पटकावले आहेत. सुशीलाचे क्रीडा क्षेत्रातील हे अतुलनीय कार्य केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नसून देशासाठी केली गेलेली एक कामगिरी आहे.

मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द हे गाव. पायाभूत सुविधांनी व लोकसंख्येने कमी असलेले हे गाव जिल्ह्याच्या नकाशात शोधायलाही तुम्हाला नाकीनऊ येतील. परंतु, या लहान गावाचं नाव थेट गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते युरोपीय देशांपर्यंत गाजवणारी मुलगी आहे सुशिलाची दुर्गाप्रसाद आगाशे... सुशिलाने आजतागायत पाच वेळ राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. राज्य पातळीवर सर्वच स्पर्धांमध्ये तिने स्वर्णपदक पटकावले आहेत. सुशीलाचे क्रीडा क्षेत्रातील हे अतुलनीय कार्य केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नसून देशासाठी केली गेलेली एक कामगिरी आहे. नुकत्याच यावर्षी मार्च महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सुशिलाने सुवर्ण पदक पटकावले.