सफाई कामगार महिलेचा कौतुकास्पद प्रामाणिकपणा

Tuesday, 23 February 2021

औंध  - आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम संबंधितांना परत करून  प्रामाणिकणा जपत सफाई कामगार महिलेने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या चिखलवाडी आरोग्य कोठीत कार्यरत आशा प्रणय कांबळे ( ३२वर्षे) या महिलेचे या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.कांबळे या चिखलवाडी आरोग्य कोठीवर कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून कार्यरत आहेत.त्यांना जवळपास पाच महिने पगार झाला नव्हता.त्यांच्या खात्यात पगारापेक्षा एक लाख एकवीस हजार ही अतिरिक्त रक्कम जमा झाली होती.

औंध  - आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम संबंधितांना परत करून  प्रामाणिकणा जपत सफाई कामगार महिलेने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या चिखलवाडी आरोग्य कोठीत कार्यरत आशा प्रणय कांबळे ( ३२वर्षे) या महिलेचे या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.कांबळे या चिखलवाडी आरोग्य कोठीवर कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून कार्यरत आहेत.त्यांना जवळपास पाच महिने पगार झाला नव्हता.त्यांच्या खात्यात पगारापेक्षा एक लाख एकवीस हजार ही अतिरिक्त रक्कम जमा झाली होती. मागील पाच महिन्यांत पगार न झाल्याने कदाचित सर्व पगार जमा झाला असेल असे त्यांना वाटले परंतु इतर सहकारी कामगार महिलांना केवळ एकच महिन्याचा पगार जमा झाल्याचे कळल्यावर कांबळे यांनी मुकादम गौतम वाघमारे व अनिता बाराथे यांच्याशी संपर्क साधला.आणि अतिरिक्त रक्कम जमा झाल्याचे सांगितले.यानंतर औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक विजय भोईर यांना कल्पना दिली. मोरया एंटरप्रयजेस या कंत्राटदार कंपनीचे प्रदीप पवार यांनाही माहिती दिली.नंतर धनादेशाद्वारे या महिलेने एक लाख एकवीस हजार रूपये परत करून एक आदर्श निर्माण केला. बॅंकेकडून चुकून हि रक्कम संबंधित महिलेच्या खात्यात जमा झाल्या नंतर या महिलेने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे  कौतुक करावे तेवढे कमी असून त्या महिलेला माझा सलाम असल्याची प्रतिक्रिया प्रदीप पवार यांनी दिली. (व्हिडिओ - प्रमोद शेलार)