Tahsildar : तहसीलदारांनी श्रमदानातून रंगविल्या भिंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Neha Rananware

तहसीलदारांनी श्रमदानातून रंगविल्या भिंती; पाहा व्हिडिओ

Published on : 7 September 2021, 11:06 am

माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर तहसील कार्यालय परिसराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील संरक्षक भिंतीवर जाहिराती करून परवानगी न घेता प्रशासकीय इमारतीच्या भिंती विद्रूप करण्यात आल्या होत्या. या बाबीची गंभीर दखल घेत तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी श्रमदानातून या भिंतीवरील जाहिराती मिटवून टाकल्या. नंतर कोणी जाहिराती केल्यास कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. नायब तहसीलदार व्ही. टी.गोविंदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, काँग्रेसचे अम्रुत जगताप, निवडणूक विभागाचे प्रमुख वानोळे, प्रकाश शेडमाके, रेणुकादास आठवले व विलासराव आदींनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान केले.

Web Title: Tahsildar Wall Painting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..