esakal | नागरिकांनी सतर्क राहण्याच्या हवेली तहसीलदारांच्या सूचना; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

नागरिकांनी सतर्क राहण्याच्या हवेली तहसीलदारांच्या सूचना; पाहा व्हिडिओ

May 17, 2021

खडकवासलाKhadakwasla- राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून Tauktae Cyclone संदर्भात जिल्हा व Tehsildar पातळीवर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर परिसरात मुसळधार पाऊस पडणार आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांनी दिल्या आहेत. हवेली तालुक्याच्या Khadakwasla, सिंहगड या पश्चिम भागात दरवर्षी जास्त पाऊस पडतो. परंतु या Tauktae Cyclone पार्श्वभूमीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी. अशा सूचना देत असताना या वादळामुळे काय खबरदारी घेण्याची गरज आहे किंवा शेती पिकांचे काय नुकसान होईल. याची पाहणी करण्यासाठी मंडलाधिकारी विकास पाटील, डोणजेच्या तलाठी वर्षा आरमाळकर मालखेडच्या तलाठी सोनल बाभाळे, खानापूर तलाठी चांदपाषा तांबोळी यांच्या बरोबर आंबी, सोनापूर, मालखेड, खानापूर, गोऱ्हे बुद्रुक, मणेरवाडी, डोणजे, गोऱ्हे बुद्रुक या गावातील पिकांची पाहणी केली.(व्हिडिओ -राजेंद्रकृष्ण कापसे)