Video : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज शेवटचा अल्टिमेटम
राज्यातील एसटी कर्मचारी संघटना अद्याप संपावर ठाम असून विलीनीकरणाची मागणी जोर धरत आहे. मात्र, दोन्ही सभागृहात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत निवेदन करताना, एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर रुजू होण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा एकदा आवाहन केलं होतं. कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांवरील सर्व कारवाया मागे घेण्याचंही परिवहनमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही अल्टिमेटम दिला. यानंतर एसटी महामंडळाने परिपत्रक काढलंय. या परिपत्रकात संपकऱ्यांवर झालेल्या सर्व कारवाया मागे घेण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे आज कामावर हजर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली असल्यास ती मागे घेण्यात येणार आहे. सेवासमाप्तीची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांनाही उद्यापासून पुर्ननियुक्तीचे आदेश देण्यात येतील.
Web Title: Today Is The Last Ultimatum For St Employees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..