आज काय विशेष: आत्महत्या प्रतिबंधक दिवस 

Thursday, 10 September 2020

पुणे - तुम्हाला माहितीय का? जगात दरवर्षी जवळपास आठ लाख आत्महत्या होतात. म्हणजे 40 सेकंदाला एक आत्महत्या... यापैकी भारतात दरवर्षी जवळपास 1 लाखाहून अधिक आत्महत्या होतात... म्हणजे दिवसाला 381 हून अधिक.  अलीकडेच झालेली सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आजही चर्चेत आहे. एन सी आर बी अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागच्या वर्षी म्हणजे 2019 ला 1 लाख 39 हजार 123 लोकांनी आत्महत्या केली आहे. भारतात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून गेल्या वर्षी 18,916 आत्महत्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.

पुणे - तुम्हाला माहितीय का? जगात दरवर्षी जवळपास आठ लाख आत्महत्या होतात. म्हणजे 40 सेकंदाला एक आत्महत्या... यापैकी भारतात दरवर्षी जवळपास 1 लाखाहून अधिक आत्महत्या होतात... म्हणजे दिवसाला 381 हून अधिक.  अलीकडेच झालेली सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आजही चर्चेत आहे. एन सी आर बी अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागच्या वर्षी म्हणजे 2019 ला 1 लाख 39 हजार 123 लोकांनी आत्महत्या केली आहे. भारतात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून गेल्या वर्षी 18,916 आत्महत्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. भारतातील एकूण आत्महत्यांपैकी 67 टक्के आत्महत्या या 18 ते 45 वर्षे या वयोगटातील म्हणजेच तरुण आणि प्रौढ लोकांच्या आहेत.  2018 सालापेक्षा 4 टक्क्यांनी ही संख्या वाढलेली आहे.