Uddhav Thackeray Birthday : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना हटके शुभेच्छा दिल्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Uddhav Thackeray Birthday : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना हटके शुभेच्छा दिल्यात

Published on : 27 July 2022, 10:31 am

ठाकरे विरुद्ध शिंदे वादात आता औपचारिक का होईना पण संवादाला सुरुवात झाली. म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं ट्विट एकनाथ शिंदेंनी टाकलंय, ज्याची सध्या राज्यात चांगलीच चर्चा सुरुए. कारण या ट्विटमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा केलाय. पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख मात्र टाळलाय. सध्या शिंदे गटाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सध्या ठाकरे विरुद्ध शिंदे हा वादही सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारी आहे. त्या पार्श्वभूमीवरच सावधानता म्हणून एकनाथ शिंदेंनी जाणीवपूर्वकरित्या उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केलेला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुसरीकडे खरंच एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असल्याची चर्चाही दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरु झालीए.

तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंप्रमाणेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. इथे फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलंय आणि त्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असाच केलाय. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. आणि आजच्या भागातही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय आणि भाजपला सावधातनेचा इशारा दिला.

अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावलेत. कालच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातही उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि बंडखोरांवर टीका केली होती. आणि आजच्या भागात तर त्यांनी शिंदे थेट लालची असल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता या टीकेला एकनाथ शिंदे नेमकं काय उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर आमदार, खासदारांच्या जाहिराती दैनिक सामनानं नाकारल्या, अशी माहिती शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळेंनी दिली. दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सामनात मोठमोठ्या जाहिराती दिल्या जातात. पण यंदा शिवसेनेच्या बंडखोर आणि शिंदे गटातील आमदार-खासदारांच्या जाहिराती मात्र सामनानं नाकारल्यात. तरी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी का होईना पण एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरुन ठाकरेंशी एकतर्फी संवाद साधलाय हे नक्की. याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा. अशाच ताज्या आणि हॅपनिंग घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी सकाळची वेबसाईट आणि सकाळच्या युट्युब चॅनलला भेट द्यायला विसरू नका.

Web Title: Uddhav Thackeray Birthday Eknath Shinde Wished Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..