Vasant More : गरिबांची घरं नाकारणाऱ्या Builderला तात्यांनी शिकवला असा धडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Vasant More : गरिबांची घरं नाकारणाऱ्या Builderला तात्यांनी शिकवला असा धडा

Published on : 23 November 2022, 1:30 pm

वसंत तात्यांनी आज चक्क हातोडाच आपल्या हातात घेतलाय

कात्रजच्या संतोषनगरमधील बिल्डरनं किरकोळ पैशांसाठी गरिबांची घरं देण्यास टाळाटाळ केली होती

म्हणजे २६ लाखाचा फ्लॅट घेतलेल्या व्यक्तीनं २४ लाख दिले, २ लाख राहिले म्हणून तर कुणी १७ लाखाचा फ्लॅट घेतला अन् ९० हजार शिल्लक राहिले तरी बिल्डरनं लोकांना घराचा ताबा दिला नाही

मागील महिन्यातही या बिल्डरला समज देण्यात आली होती तरी बिल्डरनं लोकांना घराच्या चाव्या दिल्या नाहीत

मग काय प्रकरण? तात्यांकडे गेलं अन् त्यांनी डायरेक्ट सोक्षमोक्षच लावला

आपल्या स्टाईलमध्ये हातोडा मारुन कुलूप तोडून तात्यांनी फ्लॅट बुक केलेल्यांना घरात प्रवेश मिळवून दिला

आता या प्रकरणात बिल्डर पुढे काय कारवाई करतो की आणखी काही घडतं हे पाहणं महत्वाचं असेल