Video: Operation Lotus दिल्लीत अपयशी ठरलं? पण भाजप ‘आप’च्या मागे का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कोमल जाधव

Video: Operation Lotus दिल्लीत अपयशी ठरलं? पण भाजप ‘आप’च्या मागे का ?

Published on : 26 August 2022, 2:28 pm

ऑपरेशन लोटस हे सध्या संपूर्ण देशभरातील राजकारणात चांगलंच चर्चेत आहे. २०१९ साली आणि त्यानंतरही महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. त्याअंतर्गत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. आताही राज्यातील सत्तांतरावेळी शिंदे गटाला बाजूला करण्यात भाजपचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नक्कीच झाली. त्यात आता भाजपचा निशाणा हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर असल्याचं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही भाजपनं ऑपरेशन लोटस सुरु केल्याची चर्चा आहे. आणि या चर्चेला आज पूर्णविराम देऊन भाजपचं दिल्लीतील ऑपरेशन लोटस केजरीवालांनी अपयशी ठरवल्याचा दावा आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केला.

Web Title: Video On Operation Lotus And Why Bjp Is Behind Aap In Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..