esakal | विठुरायाच्या भेटीचा योग यंदाही नाहीच!;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

विठुरायाच्या भेटीचा योग यंदाही नाहीच!;पाहा व्हिडिओ

Jun 11, 2021

'पाऊले चालती पंढरीची वाट'या गजरात आपल्या पांडुरांगच्या भेटीला मोठ्या भक्तीभावाने जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी आषाढी वारी हा एक उत्सव असतो, त्यांचा उत्साह महाराष्ट्र Maharashtra कित्येक वर्षांपासून पाहत आलाय. पण, सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्याला कडेवर हात ठेवून उभा असलेल्या प्रिय पांडुरंगापासून सोशल डिस्टंसिंग ठेवण्याची वेळ आलीये. गेल्या वर्षीही आळंदी - पंढरपूर Pandharpur पायी वारी झाली नव्हती. यंदा कोरोनाची दुसरी लाट आली आणि ओसरली. पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून वारकऱ्यांना पायी वारी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यापासून ते पंढरपुरात पालखी आगमनापर्यंत पालखी सोहळा कसा होईल याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी दिलीये. अजित पवार नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेऊया...