Rss ने DP बदलल्यावर काय घडलं ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rss ने DP बदलल्यावर काय घडलं ?

Published on : 13 August 2022, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक घरावर भारतीय ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात आलं होते. त्याचबरोबर सोशल मीडिया हॅंडेलवरील डिपी देखील तिरंग्याचा ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं होते.

त्यानुसार आज अनेक नेत्यांनी घरांवर तिरंगा फडकावला. त्याचबरोबर बीजेपीच्या नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील डिपी देखील तिरंग्याचे ठेवले होते. असं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचा डिपी कधी बदलणार असा प्रश्न विचारला जात होता.

आरएसएस तिरंग्याचा डिपी ठेवणार नाही अशी टीका देखील करण्यात येत होती. अखेर आरएसएसने त्यांच्या सर्व सोशल मीडिया हॅंडेलवर तिरंगा लावला आहे. त्याचबरोबर आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे ध्वजारोहण करत असल्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

आरएसएसने जरी तिरंग्याचा डिपी ठेवला असला तरी त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.

एका नेटकऱ्याने तिरंग्याचा स्वीकार केल्याबद्दल आरएसएसचं अभिनंदन केलंय. तर एकाने नागपूरच्या आरएसएसच्या मुख्यालयावर सुद्ध तिरंगा फडकवला जाईल अशी आशा व्यक्त केली आहे.

तर एकाने देर आए दुरुस्त आए असं म्हंटलं आहे.

फेसबुकवर बदललेल्या डीपीला आत्तापर्यंचत ५६ हजार लाईक्स तर ३ हजारांहून अधिक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. आरएसएस प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेते. त्याचबरोबर भगव्या झेंड्याचा पुरस्कार करते त्यामुळे आरएसएस त्यांचा डीपी बदलणार नाही असं म्हंटलं जात होतं. परंतु आता डिपी बदलत आरएसएसने उत्तर दिलं आहे.

Web Title: What Happened When Rss Changed Dp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..