Video : Eknath Shinde यांच्या कार्यक्रमात अशी कुठली घटना घडली ?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता अनेक सत्कार कार्यक्रम राज्यात पार पडत आहेत. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आता शिंदे गटामध्ये जात आहेत. त्यांच्यामार्फत विविध कार्यक्रमांच देखील आयोजन करण्यात येत आहे.
अशाच एका कार्यक्रमात घडलेल्या घटनेमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जातीये. त्याचं झालं असं की शिंदे गटाला पाठींबा देणारे आमदार किशोर पाटली यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला कार्यकर्ते देखील मोठ्याप्रमाणावर जमले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जायला निघाले तेव्हा अनेक कार्यकर्ते मंचावर त्यांना भेटायला गेले. त्यामुळे मंचावर गर्दी झाली. यातच मंचावर ठेवलेल्या महापुरुषांच्या फोटोंना धक्का लागला. या धक्क्यामुळे काही प्रतिमा खाली कोसळल्या. काही कार्यकर्त्यांनी त्या उचलून पुन्हा जागेवर ठेवल्या.
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होतोय. महापुरुषांच्या प्रतिमा पडल्यामुळे टीका देखील केली जात आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ट्विटरवर लिहीताना म्हणतात, राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही निषेध
अभिषेक पवार या ट्विटर युजरने लिहीलं आहे की महापुरुषांच्या मुर्त्या पाडणारे आणि हिंदुत्वाचा ढोंगीपणा करणारं शिंदे सरकार...थोडी तरी शरम बाळगा, ज्यांच्या उपकारामुळे आज महाराष्ट्र राज्य जिवंत आहे ; त्याच महापुरुषंच्या मुर्त्यांना पाडत आणि अवमानित करत आहात....
तर हे कसले कार्यकर्ते ज्यांना महापुरुषांच्या प्रतिमा आहे धक्का लागेल पडेल याची देखील चिंता नाही.. असं शिल्पा बोडखे या महिलेने ट्विटरवर लिहिले आहे.
त्यामुळे आता या घटनेमुळे शिंदे सरकारवर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे.
Web Title: What Incident Happened In Eknath Shindes Program
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..