व्हिडिओ
भारतानं यंदाच्या उन्हाळ्यात गव्हाची विक्रमी निर्यात केली. पण देशातील मागणी पुरवठ्याचं गणित बिनसलं. सरकारनं निर्यातबंदी केल्यानंतरही दरातील वाढ सुरुच आहे. ऑगस्ट महिन्यातील दर गेल्यावर्षीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळं दर कमी करायचे असतील तर आयातीचा एकमेव मार्ग आहे, असं जाणकार सांगतात. परिणामी उन्हाळ्यात गव्हाची विक्रमी निर्यात करणाऱ्या भारतावर हिवाळ्यात आयात करवी लागणार आहे. पण जगाची भूक भागवण्याची क्षमता असणाऱ्या भारतावर आयातीची वेळ का आली? देशातील गव्हाचे दर कसे आहेत? भारताला आता गहू आयात परवडेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.