रुतलेल्या बसचा eSakal.com चाच फोटो खरा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

परभणीतील चिखलात रुतलेल्या बसचा फोटो अनेक दैनिकांनी छापला. प्रत्येकाने तो वेगवेगळ्या ठिकाणचा असल्याचे आपल्या बातमीत सांगितले. परंतु, त्या रुतलेल्या बसचा फोटो हा परभणी-जिंतूर रोडवरील जलालपूर पाटीजवळचा असल्याचे केवळ esakal.com नेच सांगितले आणि त्या फोटोमागील सत्यता पडताळल्यास तो फोटो परभणी जिंतूर रोडवरीलच असल्याचे समोर आले आहे.

पुणे : परभणीतील चिखलात रुतलेल्या बसचा फोटो अनेक दैनिकांनी छापला. प्रत्येकाने तो वेगवेगळ्या ठिकाणचा असल्याचे आपल्या बातमीत सांगितले. परंतु, त्या रुतलेल्या बसचा फोटो हा परभणी-जिंतूर रोडवरील जलालपूर पाटीजवळचा असल्याचे केवळ esakal.com नेच सांगितले आणि त्या फोटोमागील सत्यता पडताळल्यास तो फोटो परभणी जिंतूर रोडवरीलच असल्याचे समोर आले आहे.

अन् एसटी रुतली चिखलात...

हा फोटो 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात आला होता. बसचे वाहक आणि परभणी स्थानक याची पुष्टी केली आहे. अनेक दैनिकांनी सोशल मीडियावरील या फोटोची शहानीशा न करता चुकीच्या माहितीसह तो छापला असल्याचे समोर आले आहे. अनेक दैनिकांनी हा फोटो औरंगाबाद-जळगाव रोडचा म्हणून छापला होता.

फॅक्ट क्रेसेंडोने केलेल्या फॅक्ट चेकनुसारही ते समोर आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तिन्ही जिल्हातील स्थानिक पत्रकार, संबंधित गावातील लोक आणि बस स्थानकांशी संपर्क केला. औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक व पत्रकारांनी एकतर संबंधित फोटो त्यांच्याकडील नसल्याचे सांगितले किंवा या घटनेचे इतर फोटो देण्यास असमर्थता दर्शवली. बसचा क्रमांक MH 20 BL 1318 स्पष्ट दिसतो. तसेच ही बस परभणी डेपो असल्याचेही कळते. त्यानुसार मग फॅक्ट क्रेसेंडोने परभणी बसस्थानकाशी संपर्क साधला. तेथील सहायक वाहतूक अधीक्षक (स्थानकप्रमुख) वर्षा येरेकर यांनी हे फोटो परभणी जिल्ह्यातील असल्याचे सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fact Check St bus stuck in mud at parbhani Jintur Road