Viral : यंदाच्या लग्नसराईत अंतराळातही ‘नवरी नटली’; व्हायरल होतायत फोटो!

हीच पोस्ट डिझाईन एजन्सी कर्क बॉक्सच्या पेजवरही शेअर करण्यात आली आहे.
Viral : यंदाच्या लग्नसराईत अंतराळातही ‘नवरी नटली’; व्हायरल होतायत फोटो!

सोशल मिडियावर रोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातील काही फोटो पाहुन ‘वाह, क्या बात है’ असं पटकन आपल्या तोंडातून निघून जाते. असाच एक आश्चर्यचकित करणारा फोटो व्हायरल होत आहे.

सध्या जगभर लगिन सराई सुरू आहे. दिवाळी झाली की लोक लग्नाचा बार उडवायला मोकळे होतात. त्याआधीच लोक वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट करून घेतात. सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोत एक नववधू अंतराळवीराच्या पोषाखात दिसत आहे.

Viral : यंदाच्या लग्नसराईत अंतराळातही ‘नवरी नटली’; व्हायरल होतायत फोटो!
Viral Video : जावईबापूला टस्सल, सासरेबुवांचा सिक्सर!; अन्नाच्या बॅटिंगवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

लोकांनी हे फोटो पाहुन अंतराळात लग्न लागले की काय? अशी विचारणा केली आहे. पण, तसे काही नाहीये. हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) द्वारे बनवले गेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून वेगवेगळी चित्रे तयार करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral : यंदाच्या लग्नसराईत अंतराळातही ‘नवरी नटली’; व्हायरल होतायत फोटो!
Viral : तरूणाने गच्चीवरच केला बेली डान्स; Video पाहून लोकं बिथरले

आर्टिस्ट जयेश सचदेव यांनी अंतराळवीर वधूच्या पोशाखाची ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. हीच पोस्ट डिझाईन एजन्सी कर्क बॉक्सच्या पेजवरही शेअर करण्यात आली आहे. छायाचित्रात मॉडेलने नवरीचा लुक केला आहे. त्यावर तिने कॅथलिक आणि हिंदू पद्धतीच्या नवरीचा मेकअप आणि ज्वेलरी घातली आहे.

Viral : यंदाच्या लग्नसराईत अंतराळातही ‘नवरी नटली’; व्हायरल होतायत फोटो!
Viral Video : तिकिटासाठी 'पठान' चा फॅन ढसाढसा रडला; म्हणाला...

इंस्टाग्रामवरील ही पोस्ट व्हायरल होत आहे. लोकांनी याचे खूप कौतूक केले आहे. या पोस्टला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्यावर नेचकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, 'हे खूपच वेगळं आणि सुंदर आहे!! दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'नासामधील अंतराळवीर इंडियन सिनेमातील सुनेसारखी दिसते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com