Viral Satya : गायीच्या दुधात सोनं असतं? (Video)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

गायीच्या दुधात सोनं नसतं
दुधामध्ये केरोटीन असल्यामुळं ते पिवळं दिसतं 
गायीच्या दुधात सोनं असतं हा गैरसमज आहे
व्हिटॅमिन ए असल्यामुळेही दूध पिवळ्या रंगाचं दिसतं

देशी गायींच्या दुधात सोनं असतं असा अजब दावा करण्यात आलाय. पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी हा दावा केलाय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या आश्चर्यकारक दाव्याबद्दल खिल्ली उडवली जातेय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देशी गायीच्या दुधात पिवळसर प्रतिबंधक गुणधर्म आहेत.या दुधावर एक व्यक्ती जगू शकते. हे दुध प्यायल्यावर काहीही खाण्याची गरज नाही. ते पूर्ण अन्न आहे.

दुधात सोनं असल्याचा दावा केल्यानं खरंच पिवळसर दिसणारं दुधात काय असतं. याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल अधिक माहिती पशुसंवर्धन विषयाचे अभ्यासक देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी पशुसंवर्धन अभ्यासकांना भेटले आणि त्यांच्याकडून गायीच्या दुधात सोनं असतं का याबद्दल जाणून घेतलं.

गायीच्या दुधात सोनं नसतं हे स्पष्ट झालं. गायीच्या दुधात सोनं असतं याबद्दल कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं अभ्यासक सांगतात. पण, गायीच्या दुधात पिवळसर रंगाचं काय असतं याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. 

गायीच्या दुधात सोनं नसतं
दुधामध्ये केरोटीन असल्यामुळं ते पिवळं दिसतं 
गायीच्या दुधात सोनं असतं हा गैरसमज आहे
व्हिटॅमिन ए असल्यामुळेही दूध पिवळ्या रंगाचं दिसतं

Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video)

Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video)

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Video Cow milk