esakal | Viral Satya : चालत्या कारवर बसला बलाढ्य हत्ती (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Satya : चालत्या कारवर बसला बलाढ्य हत्ती (Video)

Viral Satya : चालत्या कारवर बसला बलाढ्य हत्ती (Video)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नॅशनल पार्कातून वेगानं कार चालली होती. त्याचवेळी एक बलाढ्य हत्ती आला आणि हत्ती कारवर बसला. हत्ती कारवर बसल्यानं कार पुढेही सरकत नव्हती आणि मागेही जात नव्हती. बिचारा कारचालक मोठ्या संकटात अडकला. आता काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. हत्ती कारवर बसल्यानं कार एका बाजूनं चेपली होती. तरीदेखील कार चालक जीव मुठीत धरून कार पळवण्याचा प्रयत्न करत होता...किती भयानक प्रसंग या कारचालकावर ओढावलाय पाहा. हत्ती बसून ही कार हालवत असल्यानं ही कार कधीही पलटी होऊ शकते याची भीती होती. पण, या कारचालकानं धीर सोडला नाही. तो हत्तीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत राहिला.

अखेर या कारचालकानं हत्तीच्या तावडीतून कशीबशी सुटका केली .आता बघा हत्ती कारवरून उठताच कारचालकानं कारचा वेग वाढवला आणि कार घेऊन पळ काढला. मोठ्या संकटातून या कारचालकानं आपली सुटका केली. 

हा सगळा प्रकार थायलंडच्या याई नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळालाय. 35 वर्षीय डुए नावाचा हत्ती नॅशनल पार्कमध्ये रस्त्यावरून चालत होता. त्याचवेळी ही कार समोर आली आणि हत्तीनं कारवर बसला. हत्ती कारवर बसल्यानं कारचं नुकसान झालं. पण, हत्तीला न घाबरता कारचालकानं धाडस केल्यानं त्याचा जीव वाचला. प्राणी जर चिडले तर काय करतात हे यातून पाहायला मिळालंय. त्यामुळं नॅशनल पार्कमध्ये प्राण्यांसमोर जाऊ नका, त्यांचा फोटो काढू नका, हॉर्न वाजवू नका.

Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video)

Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video)

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)