Viral Satya : मजुराच्या गळ्याला अजगराचा विळखा (Video)

Viral Satya : मजुराच्या गळ्याला अजगराचा विळखा (Video)

गळ्याला विळखा घातलेला भलामोठा अजगर. याच अजगराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करतेय. पण, या अजगरानं गळ्याला विळखा घातल्यानं व्यक्ती हवालदिल झालीय. आपल्या गळ्याचा विळखा सोडवण्यासाठी त्यानं प्रयत्न केला. मात्र, भल्यामोठ्या अजगराला सहज सोडवणं शक्य नव्हतं. तिथे असलेल्या साथीदारांनी धाव घेतली आणि याच्या गळ्यातल्या अजगराला ओढू लागले. अजगरानं गळ्याला घट्ट वेढा घातल्यानं सहज सुटका करणं शक्य नव्हतं. तरीदेखील या सगळ्यांनी अजगराला ओढून या व्यक्तीची सुटका केली.

या व्यक्तीचं नशीब बलवत्तर म्हणून त्याचे सहकारी याच्या मदतीला आले आणि या व्यक्तीचा जीव वाचवला. थोडासा जरी उशीर झाला असता तर याचं काही खरं नव्हतं. पण, मोठ्या संकाटातून वाचवण्यात यश आलं.

केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये ही घटना घडलीय. हा मजुर नय्यर धरणाजवळील कॉलेजमध्ये स्वच्छता करत असताना हा प्रकार घडला. जवळच असलेल्या साथीदारांनी प्रसंगावधान दाखवल्यानं या मजुराची सुटका झाली.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com