पुणेरी बाणा जपत पुणेकरांनी 'असा' साजरा केला पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

पुणेकर आणि पालखी सोहळा याचे अद्वैत असून पुणेकर भाविक दरवर्षी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता यंदा पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या पालख्यांच्या पुण्यातील स्वागताची अनेक संस्थांची दीर्घकालीन परंपरा आहे. त्याच पंरपरेला स्मरुन संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे : जगदगुरु संत तुकारम महाराज आणि माऊली संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या पालखीचे देहू आणि आळंदी येथून होणारे प्रस्थान आणि त्यानंतर त्या पालख्यांचे पुण्यातील आगमन आणि मुक्काम हा आनंदी सोहळा दरवर्षी पुणेकर अनुभवत असतात. परंतू यंदा हा सोहळा कोरोनाच्या चक्रव्युवहात अडकल्याने पुणेकरांना या आनंद सोहळ्याला मुकावे लागत आहे. अश्यात पुणेरी बाणा जपत संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्यावतीने बालगंधर्व चाैकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्या जवळ तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्र्वरीचे पूजन करुन पालखी सोहळा आणि संतांच्या कार्याला प्रतिकात्मक अभिवादन करण्यात आले.
पुण्यातील सुमारे 400 लहानग्यांची कोरोनावर मात

Image may contain: one or more people, people standing and outdoor, text that says 'पाऊले चालती पंढरीची वाट'

आपल्या शेतकऱ्याला मार्केटिंग ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे, अमोल कोल्हे यांची भूमिका

पुणेकर आणि पालखी सोहळा याचे अद्वैत असून पुणेकर भाविक दरवर्षी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता यंदा पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या पालख्यांच्या पुण्यातील स्वागताची अनेक संस्थांची दीर्घकालीन परंपरा आहे. त्याच पंरपरेला स्मरुन संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत तुकारामांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डाॅ. सदानंद मोरे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संत तुकाराम गाथा आणि संत ज्ञानेश्र्वर यांची ज्ञानेश्र्वरी डोक्यावर ठेऊन प्रातिनिधीक प्रदक्षिणा मारत दोन्ही ग्रंथांचे पूजन केले. तसेच फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, संवाद पुणे संस्थचे सुनील महाजन, ह.भ.प.चैतन्य महाराज कबीर (आळंदी), पुणे महानागरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, सचिन ईटकर, किरण साळी, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे, मंदार चिकणे, प्रशांत पवार आदी यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम सोशल डिस्कटन्सिंग आणि शासनातर्फे लागू असलेल्या नियमांचे पालन करून संपन्न झाला.

सासवडमध्ये आढळला आणखी एक कोरोनाबाधित 

Image may contain: one or more people, people standing, drink, child and outdoor

"या काळात पुण्यात भक्तीचा महापुर आलेला असतो. पंरतू यंदाची परिस्थिती वेगळी आहे. करोनाच्या प्रादूर्भावाच्या काळात वारकऱ्यांनी देखील पुढाकार घेत जो समजंसपणा आणि समन्वय दाखविला तो काैतुकास्पद आहे. करोनाच्या प्रादूर्भावामुळे या पालखी सोहळ्याला यंदा अल्पविराम मिळाला असला तरी पुढीलवर्षी त्याच जोमाने आणि उत्साहाने पुणेकर पालख्यांचे स्वागत करण्यास सज्ज राहतील, यात शंका नाही."
- महापाैर मुरलीधर मोहोळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwari and Tukaram Gatha is Historical record of Palkhi ceremony from Pune citizen