मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महापूजेसाठी पंढरपूरमध्ये

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी शनिवारी (ता. ९) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंढरपुरात आगमन
ashadhi wari 2022 mahapuja of vitthal on sunday morning performed chief minister eknath shinde on occasion ashadhi wari pandharpur
ashadhi wari 2022 mahapuja of vitthal on sunday morning performed chief minister eknath shinde on occasion ashadhi wari pandharpurSakal

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी शनिवारी (ता. ९) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंढरपुरात आगमन होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे जागोजागी फलक लावण्यात आले आहेत. आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याची प्रथा सुरु आहे.

या प्रथेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे महापूजा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी रात्री पुण्याहून पंढरपूर येथे आगमन होईल. रविवारी पहाटे २.३० ते ४.३० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होईल.

जागोजागी स्वागत फलक

मुख्यमंत्री शिंदे यांचे पंढरीत आगमन होणार असल्याने माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत, आमदार महेश शिंदे, आमदार शहाजी पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक आदींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com