तुकोबांच्या सोहळा बोरगावात

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहल्यात बुधवारी माळीनगरच्या मुख्य रस्त्यावर उभे रिंगण रंगले.
Ashadi wari 2022
Ashadi wari 2022sakal

बोरगाव : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहल्यात बुधवारी माळीनगरच्या मुख्य रस्त्यावर उभे रिंगण रंगले. सोहळा बोरगावात मुक्कामी पोचला. रिमझिम पाऊस अंगावर झेलत सोहळा सकाळी सात वाजता अकलूजहून मार्गस्थ झाला. सव्वानऊ वाजता माळीनगरच्या रिंगणाच्या टप्प्यावर पोचला. संस्थानचे सर्व आजी- माजी अध्यक्ष, सोहळाप्रमुख, विश्वस्त व चोपदार नामदेव गिराम देशमुख, चोपदार कानसूरकर यांनी उभे रिंगण लावले. देवाचा व स्वाराचा असे दोन्ही अश्व नगरखान्यापासून मागे पालखी रथाजवळ पोचला.

तेथे तुकोबारायांचे दर्शन घेतले. मागील पन्नासहून अधिक दिंड्यांपर्यंत अश्व पोचले. बोरगावला सोहळा सव्वासात वाजल्यानंतर पोचला. समाज आरतीनंतर रात्री माई दिंडीचे कीर्तन झाले, तर म्हातारबुवा पात्रुडकर दिंडीने जागर केला.

आम्ही अठरा जणी राजाभाऊ आपटे यांच्याबरोबर मोफत पिठलं-भाकरी करण्यासाठी सहभागी झालो आहोत. वारीत चालताना चांगले वाटतेय. पांडुरंगाने सगळ्यांना सुखी ठेवावे.

- सत्यभामा कदम, रा. माजलगाव, जि. बीड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com