सोपानदेवांच्या रथासाठी चार पिढ्यांपासून बैलजोडी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 June 2017

सोमेश्वरनगर -                     
माझ्या बापाची मिरासी गा देवा।
तुझी चरणसेवा पांडुरंगा ।।
तुकाराम महाराजांच्या या उक्तीनुसार सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे परिवारातील चौथ्या पिढीने संत सोपानदेवांच्या पालखीला बैलजोडी पाठविण्याची परंपरा जपली आहे. केंजळे परिवारास पंढरपूरला एकादशीदिवशी सोपानदेवांच्या पादुकांना स्नान घालणे आणि सोरटेवाडी (ता. बारामती) येथे पालखी पोचल्यावर पादुकांना महाभिषेक करणे असा परंपरेनुसार मानही मिळत आहे.  

सोमेश्वरनगर -                     
माझ्या बापाची मिरासी गा देवा।
तुझी चरणसेवा पांडुरंगा ।।
तुकाराम महाराजांच्या या उक्तीनुसार सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे परिवारातील चौथ्या पिढीने संत सोपानदेवांच्या पालखीला बैलजोडी पाठविण्याची परंपरा जपली आहे. केंजळे परिवारास पंढरपूरला एकादशीदिवशी सोपानदेवांच्या पादुकांना स्नान घालणे आणि सोरटेवाडी (ता. बारामती) येथे पालखी पोचल्यावर पादुकांना महाभिषेक करणे असा परंपरेनुसार मानही मिळत आहे.  

करंजे-सोरटेवाडी (ता. बारामती) येथील (स्व.) बापूसाहेब बाळाजी केंजळे यांचा संत सोपानदेवांचा पालखी सोहळा सुरू करण्यात मोलाचा वाटा होता. सुरवातीला ते स्वतः सोपानदेवांच्या पादुका गळ्यात अडकवून पंढरपूरपर्यंत पायी जात. काही वर्षांनी बैलगाडा तयार केला. त्यासाठी केंजळे परिवाराने स्वतःची बैलजोडी दिली होती. सोमेश्वर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष बाबालाल काकडे व संचालक विठ्ठलराव केंजळे यांच्या प्रयत्नाने पालखीला कारखान्याच्या वतीने रथ अर्पण करण्यात आला. आता रथाचा मान बदलला असला तरी बैलजोडीचा मान केंजळे परिवाराकडेच आहे. प्रसाद केंजळे, विकास केंजळे, संतोष केंजळे, प्रथमेश केंजळे या केंजळे परिवारातील तिसऱ्या व चौथ्या पिढीने खास पालखीसाठी बैलजोडी खरेदी केली आहे. या बैलजोडीचे मंगळवारी (ता. २०) सोमेश्वर कारखान्याच्या ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे, कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या रथाच्या चालकत्वाचा मान शेंडकरवाडीतील शिवदास निवृत्ती शेंडकर २०-२५ वर्षांपासून सांभाळत आहेत. प्रकाश काकडे पालखीदरम्यान बैलांची सेवा करतात. सोरटेवाडीतील कुलकर्णी परिवारातील नितीन कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी यांनीही नगारा वाहणाऱ्या बैलगाडीसाठी बैलजोडी पाठविली आहे. रथापाठोपाठ चालणारा अश्वही अंजनगाव येथील परकाळे कुटुंबीयांनी दिला आहे. पंढरपूरला एकादशीला स्नानासाठी चंद्रभागेत पादुका घेऊन जाण्याचा मान केंजळे कुटुंबीयांना आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 sopandev maharaj palkhi