Pune : वैष्णवभक्ताची सेवा करण्यात भाविक झाले दंग

उंड्री-पिसोळीकरांकडून चहापानासह खिचडी, सुका मेावा, केळी सफरचंदाचे वाटप
wari
warisakal

उंड्री : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा असे म्हणत शहर-उपनगरवासिय आषाढी वारी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आसुलेले पाहायला मिळाले. गुरुवारी (दि. २३) रात्रीपासूनच वैष्णवभक्तांना एकादशीनिमित्त खिचडी, वरईभात, केळी, सुका मेवा अशी मेजवाणी तयार करून ठेवली. शुक्रवारी पहाटे शहरातून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले आणि वारकऱ्यांचा महापूर पंढरीच्या दिशेने सुरू झाला.

भल्या सकाळपासून वारकऱ्यांच्या चहा आणि फराळ देण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, होळकरवाडी, वडकी परिसरामध्ये वारकऱ्यांचे स्वागत करून करीत माऊली चहा घ्या, माऊली फराळ घ्या, पाणी घ्या असा सूर भाविक भक्तांकडून ऐकू येत होता. हांडेवाडी रस्ता गंगा व्हिलेज सोसायटीच्या वतीने सफरचंद आणि केळीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन योगेंद्र गायकवाड, डॉ. अनिल पाटील, मोहन मोरे, दिलावरभाई शेख, विवेक मुळे, नितेश गद्रे, संतोष करंजकर आदी उपस्थित होते.

उंड्री ग्रामस्थांच्या (दिंडी क्र.९७) वतीने छोट्या-मोठ्या दिंडीकऱ्यांचा पोलीस अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दल, पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना श्रीफळ आणि शाल देऊन सन्मान कऱण्यात आले. वैष्णव भक्तांना केळी, पाण्याच्या बाटल्या, खिचडी, गुडदाणी, वेफर्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र भिंताडे, सुभाष घुले, प्रफुल्ल कदम, जयश्री पुणेकर, भाग्यश्री कदम, स्वाती टकले, अलका टकले, रेणुका भिंताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com