#SaathChal साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा 

रूपाली अवचरे
Saturday, 7 July 2018

विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक सेवाभावी संस्थांनी वारकरी भक्तांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या.  

नगरसेवक अनील ट़ि़गरे मित्रपरिवार यांच्यातर्फे वारकर्‍यांसाठी फराळवाटप करण्यात आले. नगरसेवक योगेश मुळीक, जगदीश मुळीक यांच्यातर्फे फळवाटप करण्यात आले. नवजीवन मित्र मंडळ आणि अखिल विश्रांतवाडी वडार समाजातर्फे खाऊवाटप करण्यात आले .  छावा संघटनेतर्फे वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नगरसेवक रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांनी वारकरी भक्तांसाठी बिस्किटवाटप, फळवाटप आयोजित केले होते. तसेच विविध संस्थांतर्फे केस कापणे, दाढी करणे, छत्री शिवणे, चप्पल शिवणे आदी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.  चंद्रकांत जंजिरे प्रतिष्ठान तर्फे आरोग्यतपासणी, मोफत औषधवाटप, फराळवाटप ठेवण्यात आले. यात डॉ. दिनेश सुकाळे, डॉ.प्रमोद सातपुते, डॉ. प्रमोद लिंगसे,  शामा जाधव, चंद्रकांत जंजिरेआदीनी सहभाग घेतला, साई प्रतिष्ठान, नवजीवन तरुण मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ यांनी फराळ वाटप केले. व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादर करून या कार्यकर्त्यांनी जनजागृती केली.

वडगाव शेरीमधील जैन संघाचे माजी अध्यक्ष गौतम  बुरड, यांनी वारकरी भक्तांसाठी अन्न व पाणीवाटपाच्या सोयी उपलब्ध केल्या होत्या.  यावेळी राजेंद्र बाफना, किशोर छोरिया, प्रफुल्ल कोठारी, संजय सेठीया, संजय चौधरी, ललित बुरड, ट्रकचालक, बिल्डर, बिल्डिंग मटेरिमल सप्लायर्स, गवंडी, सुतार, हमाल संघटनेतर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले.  या उपक्रमाचे आयोजन अध्यक्ष पोपट सूर्यवंशी, नामदेव टिंगरे यांनी केेले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadhusant Yatri Ghar Tachi Diwali Dasara