पंढरीच्या वाटे झाडांची बीजे...

पंढरीच्या वाटे झाडांची बीजे...

मुंबई - पंढरीच्या वाटे पडले काटे... हे चित्र बदलून, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...असे करण्याचा विडा ‘ब्रुक बाँड रेड लेबल चहा’ व ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूह यांनी उचलला आहे. ब्रुक बाँडने बनवलेले, मातीत विघटन होणारे चहाचे कप वारीत वाटण्यात येतील. त्यात झाडांचे बीज असल्याने त्यातून यथावकाश झाडे उगवून पंढरीची वाट हिरवीगार होईल...

दिवसाला वीस वीस किलोमीटर चालणारे थकले भागले वारकरी वाटेतच मिनिटभराचा विसावा घेऊन किंवा मुक्कामाच्या ठिकाणी दोन घोट चहा पितात. पण त्याचे प्लॅस्टिकचे, थर्माकोलचे कप वाटेतच पडलेले असतात, या कचऱ्यामुळे शहर, गावे अस्वच्छ होतातच. पण हे ग्लास कचराकुंडीत टाकले तरी त्यांचे विघटन न झाल्याने ते पर्यावरणाचा आणखी नाश करत तसेच पडून राहतात किंवा कचरा खाणाऱ्या पशूंच्या पोटातही जाऊ शकतात. हे चित्र बदलावे असे सर्वांनाच वाटते, पण प्लॅस्टिकच्या या कपांना पर्याय सापडत नसल्याने कोणीच काही करू शकत नव्हते. मात्र ‘ब्रुक बाँड रेड लेबल’ व ‘सकाळ’ तसेच वारीची व्यवस्था पाहणाऱ्या चोपदार फाउंडेशनच्या या पर्यावरणस्नेही उपक्रमामुळे आता हे चित्र बदलेल. ‘ब्रुक बाँड’तर्फे वारकऱ्यांना आणि वाटेवरील स्टॉलधारकांना असे हजारो पर्यावरणपूरक ग्लास वाटले जातील. विघटन  होणाऱ्या पदार्थांपासून हे ग्लास बनवले असल्याने ते कचऱ्यात किंवा मातीत जरी टाकले तरी पाणी लागल्यावर त्यांचे विघटन सुरू होईल. त्यामुळे विघटनाचा मोठा प्रश्न सुटेल. तसेच ते ग्लास तयार करताना त्यात वेगवेगळ्या झाडांची बीजे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे मातीत पडलेल्या या ग्लासातून झाडे उगवून ती देखील पर्यावरण शुद्ध करण्यास हातभार लावतील. वारीच्या मार्गात मागे उरणारी अस्वच्छता दूर करण्याचा हा खारीचा वाटा आहे. ‘ब्रुक बाँड रेड लेबल’ने केवळ व्यापारी नफा कमावण्याचा दृष्टिकोन न ठेवता वारकऱ्यांची सोय करत हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात सर्वाधिक खप असलेला हा चहा, आपलेपणाचा स्वाद, अशी आपली जाहिरात करतो. मात्र केवळ बोलण्यापेक्षा त्यांनी ‘सकाळ’च्या साह्याने ती आपुलकी प्रत्यक्ष कृतीत उतरविल्याने या उपक्रमाचे सर्व थरांतून स्वागत होत आहे. ‘रेडलेबल नॅचरल केअर’ या चहामध्ये तुळस, अश्वगंध, आले, वेलची व मुलेठी या पाच आयुर्वेदिक गोष्टी असल्याने तो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, असा कंपनीचा दावा आहे. याच जाहिरातीला साजेशा त्यांच्या या निसर्गाशी जवळीस साधणाऱ्या उपक्रमाबद्दल वारीत सर्वत्र उत्सुकता आहे.

सकाळ वृत्तपत्रसमूहाने नेहमीच पर्यावरणपूरक भूमिका घेतली आहे, मग ते वाहनांमुळे होणारे प्रदूषण असो, वा फटाके असोत वा प्लास्टिक असो. सकाळ नेहमीच या बाबींच्या विरोधात उभा राहिला आहे. ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीनेही काही महिन्यांपूर्वी प्लास्टिकविरोधात मोठी मोहीम चालवली होती. तिला अभिनेत्री जुही चावला, नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनीही सक्रीय पाठिंबा दिला होता. शहरांमध्ये तर आता प्लास्टिकचे डोंगरच उभे रहात आहेत, पण ग्रामीण भागही प्लास्टिकच्या वापरात मागे नाही. हे प्लास्टिक नदीनाल्यांमध्ये अडकून बसते किंवा शेतात रुतून बसते व तेथील प्राणीमात्रांच्या मुळावर येते. प्लास्टिकचा भयावह होत चाललेला भस्मासूर नष्ट करण्याबाबतही ‘सकाळ’ने जनजागृतीसाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यालाच अनुसरून पंढरीच्या भक्तीच्या वाटेवर तरी हा प्लास्टिकचा भस्मासूर हळुहळू नष्ट व्हावा या भूमिकेतून ‘सकाळ’ने ‘ब्रूकबाँड रेड लेबल’च्या साह्याने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

वारीची व्यवस्था पाहणाऱ्या चोपदार फाऊंडेशनने या उपक्रमाला सक्रीय साथ दिली आहे. त्यानुसार आता वारकऱ्यांनीही प्रत्यक्ष कृती करून प्लास्टिक हद्दपार करावे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. पंढरपुरात यात्रेदरम्यान स्वच्छता राखण्यासाठीच्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानेही अशीच अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे आता ब्रुक बाँड रेड लेबल व सकाळ यांनी असे पर्यावरणपूरक कप उपलब्ध करून दिल्यावर तेथील स्टॉलधारकांनी तसेच वारकऱ्यांनीही त्याचाच वापर करावा व आपल्या मुलाबाळांचेही भवितव्य सुरक्षित करावे अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com