आज रक्षाबंधनाला हे 5 सिनेमे तुमच्या भावंडांबरोबर एन्जॉय करा

सकाळ डिजिटल टीम

रक्षाबंधन

आज ९ ऑगस्टला सगळेचजण रक्षाबंधनचा सण उत्साहाने साजरा करत आहेत. आज तुमच्या भावंडांबरोबर एखादा चांगला सिनेमा बघण्याचा प्लॅन तुम्ही करत असाल तर हे सिनेमे नक्की बघा.

rakshabandhan | esakal

दिल धडकने दो

झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेला दिल धडकने दो हा सिनेमा एक खूप सुंदर सिनेमा आहे. कुटूंबातील बॉण्डिंग, समस्या यावर हा सिनेमा भाष्य करतो.

dil dhadkane do | esakal

बहीण-भावंडांचं बॉण्डिंग

यात रणवीर आणि प्रियंकाने साकारलेल्या बहीण-भावंडांचं बॉण्डिंग तुम्हाला तुमच्या भावंडांशी असलेल्या बॉण्डची आठवण करून देईल.

dil dhadkane do | esakal

बंधन

जॅकी श्रॉफ, सलमान खान, रंभा यांची मुख्य भूमिका असलेला बंधन या सिनेमाची गोष्टसुद्धा बहीण-भावाच्या नात्यावर आधारित आहे.

bandhan | esakal

सिनेमाची गोष्ट

बहिणीच्या प्रेमाला विरोध करणारा मोठा भाऊ नंतर तिच्या रक्षणासाठी कसा उभा राहतो याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल.

हम साथ साथ है

भावंडांमधील बॉण्ड कसा असावा याची गोष्ट सांगणारा हम साथ साथ है हा सिनेमा तुम्ही आज जरूर एन्जॉय करू शकता. एकत्र कुटूंब पद्धतीचं महत्त्व आणि भावंडांमधील प्रेम यावर हा सिनेमा भाष्य करतो.

hum sath sath hai | esakal

रक्षाबंधन सिनेमा

चार बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एक भावाची गोष्ट सांगणारा रक्षाबंधन हा सिनेमा आज तुम्ही पाहायलाच हवा. बहिणीसाठी स्वतः लग्न न करणाऱ्या आणि मृत बहिणीला न्याय मिळवून देणाऱ्या भावाची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल.

मुख्य कलाकार

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

पसामलार

राजशेखरन आणि त्याची धाकटी बहीण राधा यांच्या गोड भावा-बहिणीच्या नात्याची गोष्ट तुम्हाला पसामलार या दाक्षिणात्य सिनेमात पाहायला मिळेल. शिवाजी गणेशन आणि सावित्री गणेशन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

रक्षाबंधन विशेष गाणी - येथे क्लिक करा