सध्या स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका बरीच चर्चेत आहे. कारण आई म्हणजेच अरुंधतीनं आपला मित्र आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयात तिला अनेक अडचणी येतात पण त्या लाख अडचणींचा सामना करून अखेर हे लग्न यशस्वी झाले आहे.
नुकतेच या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
यासाठी अरुंधतीला रोज नव्या संघर्षाला सामोरे जावे लागले पण ती बधली नाही. अखेर त्या दोघांनी लग्नगाठ बांधलीच.
अरुंधती आणि आशुतोषचं हे लग्न धुमधडाक्यात पार पडलं. विशेष म्हणजे अप्पांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे हे लग्नं देशमुखांच्या घरात म्हणजे अरुंधतीच्या पहिल्या सासरी अगदी थाटात पार पडलं.
लवकरच हा सोहळा तुम्हाला मालिकेत विशेष भागात अनुभवता येणार आहे.