'तू माझा चित्रपट बघ, मी तुझा!' चाललं काय?

| Sakal

आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी होतेय.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून आमिरला लाल सिंग चढ्ढावरुन ट्रोल केले जात आहे. त्यानं यापूर्वी केलेल्या वक्तव्याचा त्याला फटका बसत असल्याचे सांगण्यात येतंय.

| Sakal

आता आमिरनं अक्षयचा रक्षाबंधन चित्रपट पाहिल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे अक्षयही आमिरच्या लाल सिंगच्या स्पेशल स्क्रिनिंग असल्याची चर्चा होती.

| Sakal

सोशल मीडियावर हे दोन्ही सेलिब्रेटी चाहत्यांना आपले चित्रपट पाहण्याचे आवाहन करत आहे.

| Sakal

आमिरनं तर भावूक होत चाहत्यांची माफी मागत कोणताही वाद न करता चित्रपट जरुर पाहा असे म्हटले आहे.

| Sakal

अक्षयनं भारतातील अर्थव्यवस्थेला चित्रपट मोठा हातभार लावतात असे सांगुन प्रेक्षकांना काय आवडतं त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

| Sakal

बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच दोन्ही सेलिब्रेटींच्या चित्रपटावर सोबतच बहिष्कार घालण्याची मागणी पुढे आली आहे.

| Sakal

आमिरचा लाल सिंग चढ्ढा हा हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक असून आता हॉलीवूडच्या प्रेक्षकांनी देखील लाल सिंग चढ्ढावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Sakal