सुबोध भावे आणि बायोपिक; काय आहे समीकरण?

| Sakal

अभिनेता सुबोध भावे याने आजवर अनेक हिट सिनेमे दिले पण त्यामध्ये बायोपिक म्हणजेच दिग्गज व्यक्तींचे चरित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. याची सुरुवात सुबोधने १९९० मध्ये 'महात्मा बसवेश्वर' या चित्रपटातून केली.

| Sakal

रवी जाधव दिग्दर्शित 'बालगंधर्व' हा सुबोध भावेचा सर्वात हिट झालेला सिनेमा. हा चित्रपट खऱ्या अर्थाने विक्रमी आणि धाडसी चित्रपट ठरला. सुबोधला पाहून अनेकांना बालगंधर्वांचीच आठवण झाली.

| Sakal

त्यानंतर सुबोधने 'लोकमान्य' या चित्रपटातून बाळगंगाधर टिळक यांची भूमिका साकारली.

| Sakal

चरित्रपटांचा हा प्रवास सुरु असतानाच सुबोधच्या आयुष्यात एक महत्वाचा बायोपिक आला तो म्हणजे 'आणि काशिनाथ घाणेकर'. या चित्रपटात सुबोधच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले आणि सुबोध म्हणजेच बायोपिक असे समीकरण झाले.

| Sakal

आता सुबोध भावेंच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आला आहे. सुबोध 'छत्रपती शिवाजी महाराजां'ची भूमिका साकारणार आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेला 'हर हर महादेव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुबोध महाराजांच्या भूमिकेत आहे.

| Sakal