बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या सतत चर्चेत असते. अभिनेत्री नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.
अर्जुन कपूरसोबत ती या कार्यक्रमात पोहोचली होती. आता मलायका अरोराने या कार्यक्रमात परिधान केलेल्या आउटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
मलायका काळ्या रंगाचा बॅकलेस कट-आउट आउटफिट परिधान करताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये मलायका अरोरा तिची कर्वी फिगर जबरदस्त फ्लॉन्ट करत आहे. हा आउटफिट MÔNOT च्या VIP कलेक्शनपैकी एक आहे.
या आउटफिटची किंमतही लाखोंमध्ये असल्याचं समजतं. मलायका या ड्रेसमध्ये धुमाकूळ घालत आहे.
मलायका अरोराचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पण दरम्यान मलायकाची तुलना अमेरिकन मॉडेल पॅरिस हिल्टनशी केली जात आहे.
खरं तर, मल्लाच्या आधी पॅरिस हिल्टनने ड्रेस ब्रँडच्या जाहिरातीसाठी हा आउटफिट परिधान केला होता.