अभिनेत्री अक्षया नाईक म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी लतिका..
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून लतिका हे पात्र साकारत अक्षया घराघरात पोहोचली.
शरीराने लठ्ठ असणाऱ्या मुलीची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेने समाजात सकारात्मक संदेश दिला.
या मालिकेत अक्षयाने अशी दमदार भूमिका साकारली की तिला सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट नायिकेचा सन्मान मिळवला.
यंदाही तिला कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नायिकेचा सन्मान मिळाला.
अक्षयाने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
तिच्या या आनंदात चाहतेही सहभागी झाले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.