अभिनेत्री मानसी नाईकने काही मोहक फोटो शेयर केले आहेत.
यावेळी ती सकाळी एखाद्या पार्कात उभी असल्याचे दिसते.
या फोटोंना तिने भन्नाट कॅप्शन दिले आहे.
बऱ्याचदा आपल्याला वाटते की आपण अलिप्त व्हायला हवे, पण अशाच वेळी आपल्याला जेजे हवे ते मिळाले पाहिजे.. असे ती म्हंटली आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटस् चा पाऊस पाडला आहे.
सध्या मानसी घटस्फोटाच्या प्रक्रियेत आहे.
त्यामुळे लवकरच ती आपला पती प्रदीप याच्यापासून विभक्त होणार आहे.