काही लोकांना शारीरिक संबंधांनंतर लघवीला न जाण्याची सवय असते. ते तसेच झोपून जातात.
मात्र हे अयोग्य आणि तेवढेच धोकादायक आहे. जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवताना अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
शारीरिक संबंध ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. सेक्सनंतर लघवी न केल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, महिलांचा मूत्रमार्ग लहान असल्याने जिवाणू सहजपणे मूत्राशयात जाऊ शकतात. त्यामुळे नीट स्वच्छता न बाळगल्यास स्त्रियांना मूत्रमार्गाचा संसर्ग होऊन त्रास होऊ शकतो.
सेक्सनंतर प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता न केल्यामुळे आणि लघवी न केल्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच UTI होण्याचा धोका असतो.
सेक्स करताना बॅक्टेरिया त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे बॅक्टेरिया वाढतात. म्हणूनच महिलांनी सेक्सनंतर लगेचच लघवी करणे महत्वाचे ठरते.
जर तुम्हाला सेक्सपूर्वी लघवी करण्याची इच्छा होत असेल, तरीही तुम्ही ते टाळत असाल तर हे देखील योग्य नाही.
रुषांना याचा धोका कमी असतो मात्र स्त्रियांनी या बाबींची विशेष काळजी घेणे महत्वाचे असते.