अनारकलीत ऐश्वर्या दिसली अन् पब्लिक पागल...

प्रणाली मोरे

ऐश्वर्या जे घालते ते तिच्यावर खुलून दिसतं. जरी आपण म्हटलं की तिनं तो पेहराव केल्यानं त्या पेहरावाला चारचॉंद लागले तरी ते काही चुकीचं ठरणार नाही.

Esakal

ऐश्वर्या बहुतांशी कार्यक्रमात हजेरी लावताना आपला लूक हा अनेकदा ट्रेडिशनल ठेवते. तिनं नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोवर एका चाहत्यानं,'आम्हाला मारायचा प्लॅन आहे का?' असा सवाल केलाय.

Esakal

ऐश्वर्याची अनेकदा पसंती ही अनारकली ड्रेसेसनाच असते.

Esakal

गेल्या ५ ते १० वर्षात तिनं घातलेले फक्त अनारकली ड्रेससचं कलेक्शन पाहिलं तर तिच्याकडील अनारकली ड्रेसेसच्या कलेक्शनचा अंदाज येईल आपल्याला.

Esakal

ऐश्वर्याच्या प्रत्येक अनारकली ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा खिळतातच. त्याचे रंग,डिझाईन सगळंच भरजरी अर्थात तिचे अनारकली डिझायनरकडून खास तयार करुन घेतले जात असतील यात नो डाऊट.

Esakal

पण ऐश्वर्याच्या अनारकलीमध्ये फिक्कट रंगाचे तिनं घातलेले अनारकली देखील तितकेच भाव खाऊन जातात.

Esakal

ऐश्वर्या गेल्या काही दिवसांत 'पोन्नियन सेल्वन -1' या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या बिग बजेट सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी अनारकलीच परिधान करुन उपस्थित राहिलेली दिसली.

Esakal

नुकत्याच एका कार्यक्रमात ऐश्वर्यानं घातलेला पांढऱ्या रंगाचा अनारकली सगळ्यांच्याच नजरेत भरलाय. त्यावरचं गोल्डन रंगाचं हलक-फुलकं केलेलं नक्षीकाम अनारकलीला भरजरी लूक देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal