Bramhastra: आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'पुढं सारं फिकं! ती जिंकली

सकाळ डिजिटल टीम

आलिया रणबीरचा ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. दोन्ही सेलिब्रेटींनी आता आनंदोत्सव साजरा केला आहे.

आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना आलियानं सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी तिनं इंस्टावरुन ब्रम्हास्त्रनं गेल्या दिवसांत किती कमाई केली आहे हे सांगितलं आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात आली होती.

रणबीर आणि आलियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. पाच दिवसांमध्ये या चित्रपटानं शंभर कोटींची टप्पा पार केल्याचे सांगण्यात आले आहे.

रणबीर - आलिया पहिल्यांदाच ब्रम्हास्त्रच्या निमित्तानं एकत्र काम करत आहेत. त्यालाही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे.

व्हीएफएक्स, ग्राफीक्स, छायाचित्रण आणि गाणी यामुळे ब्रम्हास्त्रचे सगळीकडे कौतूक होताना दिसत आहे.

केवळ बॉलीवूडच नाहीतर साऊथमध्ये देखील या चित्रपटानं चांगली कमाई केल्याचे आकडे समोर आले आहे.

ब्रम्हास्त्रमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नागार्जुन, मौनी रॉय, दीपिका यांच्या भूमिका आहेत.

तीन भागातील या चित्रपटाचा पहिला भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून उर्वरीत दोन भागांची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.