बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहेत.
दोघांची लव्हस्टोरी आणि वैवाहिक आयुष्य नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते.
अमिताभ आणि जया त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहेत.
ही एव्हरग्रीन जोडी गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांना लग्नाच्या ५० वर्षांच्या शुभेच्छा देताना आपल्या ब्लॉगवर लिहिले , ३ जूनची सकाळ काहीच वेळात होईल आणि ती ५० वर्षांमध्ये मोजली जाईल. प्रेम, आदर आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद! जे आले आहेत आणि कदाचित येणार आहेत.
श्वेता बच्चनची मुलगी आणि अमिताभ व जया बच्चन यांची नात नव्या नंदा हिनेही या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आज जगभरातले तमाम फॅन्स अमिताभ आणि जया यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या देत आहेत.