देशातील ३० प्रसिद्ध महिला कलाकारांच्या कला पाहा - Women's Day 2023

| Sakal

महिला दिनाचे औचित्य साधत आर्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने ‘व्हॉईस ऑफ रेसिलिएन्स’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

| Sakal

महिलादिनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सदर प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

| Sakal

‘व्हॉईस ऑफ रेसिलिएन्स’ या प्रदर्शनात देशभरातील ३० प्रसिद्ध महिला कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकर रसिकप्रेमींना मिळणार आहे.

| Sakal

घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी या ठिकाणी येत्या १२ मार्च पर्यंत सकाळी ११ ते सायं ६ या वेळेत सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

| Sakal

या प्रदर्शन सुंदर फोटो लावण्यात आले आहेत.

| Sakal

महिलांच्या कला पाहून कलाप्रेमी अवाक होत आहेत

| Sakal

पुण्यातील कलाप्रेंमींना प्रदर्शनाला भेट देण्याची मोठी संधी आहे.

| Sakal

प्रत्येक कलाकृतीच्या मागे एक कहाणी असते कलाकार ती कहाणी आपल्यापर्यंत पोहोचवीत असतात, असे उद्घाटन प्रसंगी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या.

| Sakal

कलाकार हा समाजाला मिळालेला एक खजिना आहे, त्यामुळे कलाकार आणि कलेचे संरक्षण करणे आज महत्त्वाचे आहे.

| Sakal

कला ही एक उपचारपद्धती आहे, असे मला वाटते, आणि यादृष्टीने अधिक काम व्हायला हवे.

| Sakal