अपूर्वा आई कुठे काय करते मालिकेत अपूर्वा ईशा हे पात्र साकारत आहे
ईशा देशमुख कुटुंबात सर्वांची लाडकी आहे. सध्या मालिकेत ईशा आणि अनिश यांचा लव्ह ट्रॅक सुरु आहे
अपूर्वाला ईशा या भूमिकेमुळे प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं
अपूर्वा मूळची चंद्रपूरला राहणारी. चंद्रपूर मधून अपूर्वाने शालेय शिक्षण पूर्ण केलं.
पुढे सिंहगड मेकॅनिकाल इंजिनीअरिंग कॉलेज मधून अपूर्वाने तिचं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं
कॉलेजमधील नाटक आणि एकांकिका स्पर्धांमधून अपूर्वाने भाग घेतला. याशिवाय अनेक ब्रँड साठी मॉडेलिंग केलं
अपूर्वाने याआधी ती फुलराणी, वागले कि दुनिया अशा मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलंय
आई कुठे काय करते मधील इशा या भूमिकेतुन अपूर्वाला खरी लोकप्रियता मिळालीय. इशा आता प्रेक्षकांची सुद्धा लाडकी झालीय.