'शरद पवार कोणाला कळलेच नाहीत अजून..'-अशोक समर्थ

| Sakal

बॉलीवूड,टॉलीवूड आणि भोजपूरी सिनेमांत व्यस्त असलेले अशोक समर्थ मोठ्या ब्रेकनंतर मराठीत परतले आहेत.

| Sakal

'तू तेव्हा तशी' मालिकेत ते आकाश जोशी हे खलनायकी पात्र रंगवताना दिसत आहेत.

| Sakal

मराठी इंडस्ट्रीत आपल्याला रमू दिलं नाही म्हणून आपण मराठीत दिसलो नाही असं जरा स्पष्टच समर्थ म्हणाले. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे.

| Sakal

अशोक समर्थ बारामतीकर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी त्यांच्या मनात प्रचंड जिव्हाळा असणं हे ओघानं आलंच.

| Sakal

'सिंघम'नंतर काही कारणासाठी बारामतीत गेलो असताना पवारांशी जवळून संपर्क आला. त्यांचं व्हिजन मी जवळून पाहिलं,अनुभवलं त्यानंतर मी हेच म्हणेन की,'शरद पवारांना कुणी ओळखलंच नाही अजून...'

| Sakal

शरद पवार यांनी अशोक समर्थांनी दिग्दर्शित केलेला 'जननी' हा तब्बल अडीच तासांचा सिनेमा रिलीज आधी वेळ काढून पाहिला आहे. या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविलेलं आहे.

| Sakal

शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्यामुळेच आपल्याला मुंबईत आल्यावर छप्पर नशीब झालं असं अशोक समर्थ यांनी आवर्जुन सांगितलं. समर्थ स्ट्रगल काळात मुंबईत आमदार निवासमध्ये राहायचे.

| Sakal