Asia Cup : काय आहे पाकिस्तानचे हायब्रीड मॉडेल?

अनिरुद्ध संकपाळ

काय आहे हायब्रीड प्रकरण?

- नव्या हायब्रीड मॉडेलनुसार आशिया कप दोन व्हेन्यूवर खेळवण्यात येईल.

पहिला टप्पा पाकिस्तानात

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारत सोडून सर्व देश पाकिस्तानमध्ये 4 सामने खेळतील.

भारत त्रयस्थ ठिकाणी

- स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात हे सर्व देश त्रयस्थ ठिकाणी भारताविरूद्ध खेळतील.

दोन देश रेसमध्ये

- हे सामने युएई किंवा श्रीलंका या दोनपैकी एका देशात खेळवले जातील.

युएईवर फुली?

- मात्र भारत, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंकेनं युएईमध्ये सामने खेळण्यास विरोध केला आहे. कारण याकाळात युएईमध्ये प्रचंड उष्णता असते.

फायलन पाकिस्तानात नाहीच

- जर भारत फायनलमध्ये प्रवेश करण्यास अयशस्वी ठरला तरी फायलन ही त्रयस्थ ठिकाणीच होणार.

वेळापत्रक कधी होणार जाहीर?

- ज्यावेळी आशियाई क्रिकेट काऊन्सील हे हायब्रीड मॉडेल जाहीर करेल त्यावेळी आशिया कपचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.